यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित आनंद मेळाव्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांना 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे आणि जीएसटी विभागाचे विशेष आयुक्त नितीन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी, "वय हा केवळ आकडा असून कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वयाची मर्यादा नसते; ज्येष्ठ नागरिकांचा समृद्ध अनुभव नव्या पिढीसाठी अत्यंत मोलाचा आहे," असे प्रतिपादन करत ज्येष्ठांनी समाजाला सातत्याने मार्गदर्शन करत राहावे असे आवाहन केले. तसेच, नितीन पाटील यांनी सकारात्मक सामाजिक बदलासाठी ज्येष्ठांच्या एकजुटीवर व त्यांच्या मतदानाच्या महत्त्वावर भर दिला. या कार्यक्रमात राज्यातील निवडक ज्येष्ठ व्यक्ती व लातूरच्या ज्येष्ठ नागरिक संघास सन्मानित करण्यात आले.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
05 October 2025