ठाणे विभाग : ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ठाणे शाखेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रामध्ये सक्रिय असणा-या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' हे कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये सर्वांना मार्गदर्शन करत असतात. आयुष्यभर मेहनत करुन सतत दुस-यांसाठी झटणा-या ज्येष्ठ नागरिकांचा दिवस साजरा करावा, या हेतूने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वयामध्येही सक्रिय असणा-या लोकांचा सामान्यांना परिचय व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी मान्यवरांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची निवड होणार असून त्यांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. मृदुला दाढे-जोशी, निलेश निरगुडकर यांच्या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रमा पार पडेल.
- Home
- About
- Verticals
- Health, Disability and Senior Citizens
- Work under Health Vertical
- Individuals with Disabilities
- Senior Citizens
- Early diagnostic Evaluation and Intervention
- Hearing Loss Diagnosis and Treatment
- Mental Health Awareness Program
- Disability Global Certificate Distribution Program
- Health insurance scheme for Disabled
- Cochlear Implants
- State Level Conference
- Rajmata Jijau Scheme
- Health, Disability and Senior Citizens
- Initiatives
- Events
- District Centres
- Awards
- Auditorium
- Media
- Search
Select your language