यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, सारथी सुरक्षा, सहा महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने ६, ७, व ८ सप्टेंबर २०१८ रोजी वाहतूक सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन सोलापूरातील सहा महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते.


६ सप्टेंबर २०१८ रोजी संगमेश्वर येथील महाविद्यालयामध्ये पहिली कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत २५० विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी सहभाग घेतला, सौ. राजमान्य यांनी कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती वैशाली शिदे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सोलापूर यांचा सत्कार केला त्यानंतर सारथी सुरक्षा या संस्थेचे प्रमुख श्री.विनय मोरे आणि त्यांचे सहकारी आनंद राजेभोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच विभागीय केंद्राचे सदस्य श्री दत्ता गायकवाड यांचा देखील प्राचार्यांनी सत्कार केला.


प्रा. श्री. मोहोरकर यांनी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. त्यानंतर सारथी सुरक्षाचे विनय मोरे यांनी कार्यशाळेस प्रारंभ केला आणि आपल्या व्याख्यानातून रोज सरासरी ४०० अपघात आपंल्या देशामध्ये होतात आणि त्याची कारणे अनेक असल्याचे त्यांनी सांगितले. १८ ते ४० वयोगटातील नागरिकाचे अधिक बळी जातात. ही बाब लक्षात घेऊन या उपक्रमाच्या निमंत्रक खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी राज्यातल्या महाविद्यालयामध्ये जाऊन तरुण व तरुणींना याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले आहे.


संवाद स्वरुपात कार्यशाळा पार पडल्या त्यामुळे गंभीर आणि करमणूक याची जोड या कार्यशाळेत जाणवली. वाहतुकीचे नियम नीट समजावून सांगितले. फुटपाथ वरूनच का चालावे तसेच फुटताथ नसल्यास कोणती काळजी घ्यावी आणि न घेतल्यास कशाप्रकारे अपघात होऊ शकतात याची माहिती सुध्दा त्यांनी दिली. त्याचबरोबर वाहन चालवताना वेग,वाहतुकीचे नियम का पाळले जावेत तसे न केल्यास कोणत्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात कसे होतात याची माहिती व्याख्यानातून आणि दृकश्राव्याच्या माध्यमातून विनय मोरे यांनी करून दिली. अपघात टाळण्यासाठी किती बारकाव्याने काळजी घेतली पाहिजेयाचे विस्तृत विवेचन श्री.विनय मोरे यांनी आपल्या २ तासांच्या व्याख्यानातून दिले. संवादाच्या माध्यमातून अनेक शंका आणि नियम व कायदे याबाबत विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अनेक प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या.


त्यानंतर प्रमुख पाहुणे मा.वैशाली शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा यांनी मार्गदर्शन केले. आणि मोलाच्या सूचना दिल्या. तसेच तरुण पिढी हि देशाची संपत्ती आहे. आपण सर्वजण याच वयोगटातले आहात वाहतुकीचा कायदा असो अथवा इतर कायदे किंवा नियम आपण जरूर पाळले पाहिजेत. एक चांगला नागरिक म्हणून या देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे म्हणूनच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम आयोजीत केल्याचे सोलापूर विभागीय केंद्राचे सदस्य श्री.दत्ता गायकवाड यांनी याप्रसंगी सांगितले.


दि.०७ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी वि. गु. शिवदारे कला व विज्ञान महाविद्यालय दुपारी शंकरराव पाटील विज्ञान महाविद्यालय अनगर ता. मोहोळ व सायंकाळी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय येथे सदर कार्यशाळा संपन्न झाली. दि.०८ सप्टेंबर रोजी सकाळी नागेश करजगी ओरचीड महाविद्यालय आणि दुपारी कुचन महाविद्यालय येथे ही कार्यशाळा संपन्न झाली


सप्टेंबर ६, ७, ८ या तीन दिवसात सहा महाविद्यालयात एकूण सहा कार्यशाळा संपन्न झाल्या हा तीन दिवसांचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रा.मोहोरकर, शिवदारे महाविद्यालयाच्या प्रा.सौ.शिवपूजे, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्रा. गवळी, ओरचीड महाविद्यालययाचे प्रा. राजाराम चव्हाण तर कुचन महाविद्यालयाचे प्रा.निंबाळकर आणि तात्या महाविद्यालायाचे प्राध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सारथी सुरक्षाचे आनंदराजे भोसले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दिनेश शिंदे, प्रशांत बाबर आणि दत्ता भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम घेतले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर