यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूरच्या वतीने भूपृष्ठावरील जलसाठे या विषयावर कार्यशाळेचे आयोजन रविवार दि.२८ जुलै २०१९ रोजी मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी जलतज्ञ श्री अप्पासाहेब पुजारी होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन जल संपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री सी ए बिराजदार यांनी केले. विभागीय केंद्राचे हंगामी अध्यक्ष हाजी युनुसभाई शेख, श्री धर्मण्णा सादुल सोलापुर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री संजय धनशेट्टी या उपक्रमाचे समन्वयक व दै. सकाळचे मुख्य उपसंपादक श्री रजनिश जोशी हे उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत सोलापुर जिल्ह्यातील भूपृष्ठावरील जलसाठे त्यावर अवलंबून असणारी जिल्ह्यातील सिंचनाची परिस्तिथी संपूर्ण पाणीपुरवठा, प्रदूषण व त्यावरील उपाय या विषयावर सखोल मार्गदर्शन तज्ञांनी केले व चर्चा देखील झाली. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी वॉटरग्रीडची योजना राबवावी या योजनेमुळे जिल्हा टँकरमुक्त होईल असे प्रतिपादन सी. ए. बिराजदार यांनी केले.
जिल्ह्यातील ४३ लाख लोकसंख्येला वर्षभर पिण्यासाठी १० टीएमसी पाण्याची गरज असून प्रत्येक तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वॉटरग्रीड व्दारा प्रत्येक गावास मुबलक पाणीपुरवठा होईल आणि त्यातून महसूल देखील उभा राहील जलसंधारणा पेक्षा याचा खर्च सुद्धा कमी होतो हा उपाय सध्या राजस्थान, तेलगाणा व मराठवाड्यातील गोदावरी वर असे उपाय यशस्वीपणे राबवले जात आहेत.
शेतीसाठी पाण्याचा वापर कसा असावा जमीन, हवामान व पाण्याची उपलब्धता याचे नियोजन ड्रीपचा जास्तीजास्त वापर आणि त्याला अनुसरुन पिकांचे नियोजन यावर सुद्धा सविस्तरपणे चर्चा झाली. शेतकरी मुख्य केंद्रबिंदू असल्याचे सर्वांनी मान्य केले. वाढत्या शहरीकरणामुळे व उद्योगामुळे होणारे प्रदुषण आणि त्यावरील उपाय याबाबत सुद्धा चिंतन या कार्यशाळेत करण्यात आले. शहर व ग्रामीण भागातुन जवळपास ५५ जणांनी या कार्यशाळेत सहभाग नोदवला.