एकाग्रता, जिद्द, शिकण्याची मनापासुन इच्छा आणि उचित ध्येय गाठण्यासाठी महत्वकांक्षा असेल तरच अक्षय इंडिकर होता येईल असे उद्गार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी लघुपट निर्मिती कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठांन मुंबई विभागीय केंद्र सोलापुर आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापीठ याच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि २४,२५ आणि २६ डिसेंबर अशी तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय तरुण सिने दिगदर्शक अक्षय इंडीकर हे कार्यशाळेचे मार्गदर्शक होते एकूण १०० तरुण व तरुणींनी यात सहभाग घेतला होता. वाचन,चिंतन आणी प्रत्येक क्षण आपल्या दृष्टीने टिपण्याचे कौशल्य असेल तरच कोणत्याही कलेत पारंगत होता येते असे अक्षय इंबिकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले
प्रतिष्ठांचे जेष्ठ सदस्य दत्ता गायकवाड यांनी प्रतिष्ठानच्या कामाची माहिती आणि लघुपट निर्मिती कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमिका मांडली प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ मृणालिनी फडवणीस याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाच्या सामाजिक शस्त्रे संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे ,जन सौज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ चिंचोळकर अक्षय इंडिकर व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार प्रतिष्ठांचे कोषाध्यक्ष श्री.राजशेखर शिवदारे यांनी केला. समारोप विभागीय केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार श्री.धर्मना सदुल व उद्योगपती श्री दत्ता अण्णा सुरवसे यांच्या हस्ते संपन्न झाला.