
नांदेड ता. १३ (बातमीदार) यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या जिल्हा केंद्र नांदेडच्या वतीने श्री गणेश शिंदे यांचे कुसूम सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
मागच्या एक वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमाची मालिका नांदेड जिल्हा केंद्राद्वारे शहरात चालू आहे. त्याअंतर्गतच शहरात श्री गणेश शिंदे यांचे 'जीवन सुंदर आहे' या विषयावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुसूम सभागृहात दि. १७ (रविवार) रोजी सायंकाळी ७ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जागतिकीकरणाच्या बदलत्या परिस्थितीत जीवन गुंतागुंतीचे बनत जात असताना त्यातील संवेदनशील धागे आणि जीवनाचा शाश्वत प्रवास उलगडून सांगणाऱ्या गणेश शिंदे यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्र नांदेडचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, सचिव शिवाजी गावंडे व जिल्हा केंद्र नांदेड कार्यकारिणीच्या वतीने केले आहे.