नांदेड: या देशाच्या संविधानांची नियमितपणे जागृती आणि विविध कार्यक्रमाचे महोत्सव आयोजित करुन संविधान संस्कृती निर्माण करण्याची खरी गरज आहे त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संविधान अभ्यासक प्रा.डॉ.अनंत राऊत यांनी व्यक्त केले.ते यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नांदेडच्या शिक्षण कट्टा उद्घाटनानिमित्त शालेय शिक्षणात संविधानाचे महत्व या विषयी मार्गदर्शन करताना त्यानी राज्यात व देशात राष्ट्रीय सण म्हणून २६ जानेवारी व १५ ऑगस्ट साजरे करताना संविधान महोत्सव देशभरात व आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरे होणे गरजेचे असून अश्या आयोजनातूनच देशातील नागरिकांच्या मनात संविधान रुजेल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आगामी वर्षभरात शालेय विद्यार्थ्यांना संविधानाच्या ठळक तत्वांची तोंड ओळख व्हावी आणि वयोगटानुसार विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी व संविधान मोठ्या तळमळीने रुजविण्याच्या प्रयत्नात डॉ.राऊत यांनी सेंटर सोबत प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात जोमाने सहभागी होण्याचे मनोगत त्यानी यावेळी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर दत्ता तुमवाड,सेंटरच्या सदस्या अड.कल्पनाताई डोंगळीकर,माधव माधसवाड यांची उपस्थिती होती.यावेळी नांदेडमधील जाणकार या शिक्षण कट्टा उद्घाटन व शालेय शिक्षणात संविधानाचे महत्व या कार्यक्रमास आवर्जून हजर होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अड.कल्पनाताई डोंगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर बसवंते,ओंकार पाटील,माधव माधसवाड आणि प्रा.नामदेव दळवी आणि शिवाजी गावंडे यांनी परिश्रम घेतले.