सस्नेह निमंत्रण,
शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर. जिल्हा केंद्र कराड यांच्या वतीने "गुणवत्ता व पटसंख्यावाढ" या विषयावर दिनांक २४ एप्रिल २०२२ ,रविवार वेेळ दुपारी. ५ ते ७ या वेळेत शिक्षणकट्टा आयोजित करण्यात आला आहे.
गुणवत्ता व पटसंख्यावाढ हा सर्व शाळांच्या समोरील कळीचा मुद्दा आहे.शाळेचा पट अधिक असेल तर गुणवत्ता टिकून ठेवणे आवश्यक ठरते.मुळातच पट कमी असेल तर पट आणि गुणवत्ता याचा मेळ घालून शाळेचा दर्जा टिकवून ठेवावा लागतो.यासाठी शाळांनी नेमके आणि सकारात्मक प्रयत्न कोणते केले पाहिजेत ..? याची चर्चा यावेळेस शिक्षक कट्ट्यावर होणार आहे.या संदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी कराड नगरपरिषद क्रमांक-३ या शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी. अर्जुन कोळी सरांनी आपली शाळा दर्जेदार बनवण्यासाठी कोणते प्रयोग केले याचे अनुभव ऐकण्यासाठी शिक्षणकट्टयात सहभागी व्हा.
या कट्ट्यावर शिक्षक, मुख्याध्यापक,शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक,पत्रकार,पालक यांना सहभागी होता येईल. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी खाली व्हाट्सअप लिंकला जाॅईन व्हायचे आहे व तसेच आपले नाव,शाळेचे नाव,व्यवसाय मोबाईल नंबर खालील संपर्क ध्वनीवर पाठवावे ही विनंती.
कार्यक्रम निशुल्क पण नोंदणी आवश्यक आहे.
संपर्क ध्वनी -
अजय भोसले - +9199227 49449
डाॅ.वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.