पुण्यात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील १५ गुणवंत युवक-युवतींचा सन्मानपत्र व २१ हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी नव्या पिढीला संतांची व विचारवंतांची परंपरा समजून सांगण्याची गरज अधोरेखित केली, तसेच आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि ‘एआय’च्या युगातील आव्हाने व संधींवर प्रकाश टाकला. बारामतीमध्ये देशातील पहिली एआय-आधारित कृषी लॅब उभारली जात असून, चव्हाण सेंटरतर्फेही यापुढे एआय क्षेत्रात काम करण्यासोबतच एक स्वतंत्र थिंक टँक तयार केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत आणि तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या सोहळ्यात क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, कला, उद्योग, सामाजिक आणि नवनिर्मिती या क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या गुणवंतांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
21 January 2024