महत्वाचे: सदर परिषद २६ एप्रिल २०२२ रोजी न होता १२ मे २०२२ रोजी होत आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी, राज्यात कृषी आणि औद्योगिक विकासाचा पाया घातला. पंचायत राजच्या माध्यमातून लोकशाही विकेंद्रित केली आणि सामान्य माणसाला महत्व प्राप्त करून दिले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी दिनांक २५ सप्टेंबर १९८५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना करण्यात आली. सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्रावीण्य आणि विश्वासार्हता इत्यादी मूल्यांवर आधारीत प्रतिष्ठानची कार्यप्रणाली आहे. ‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे ब्रीद घेऊन, ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ हा दृष्टिकोन ठेवून आणि शेती, सहकार, पूर्वीचे अपंग हक्क विकास मंच सध्याचे आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरीक विभाग, नवमहाराष्ट्र युवा अभियान, शिक्षण विकास मंच, महाराष्ट्र महिला व्यासपीठ, कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन केंद्र च्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यरत आहे.

आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभाग

आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभाग २००७ सालापासून कार्यरत आहे. हा विभाग दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिकासाठी वेगवेगळे उपक्रम, दिव्यांग धोरण व दिव्यांगासाठीचे शासन निर्णय, परिषदा इत्यादी उपक्रम राबवत असते. गरजू दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप, कृत्रिम साहित्य व साधने वाटप, कॉक्लिअर इम्प्लांट, दिव्यांग सामुदायिक विवाह सोहळा इत्यादी उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना सुलभ पद्धतीने मिळवुन देणे आणि दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे या विभागाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. याचसोबत आम्ही आरोग्य क्षेत्रात, मानसिक आरोग्य जागृती कार्यशाळा तसेच वेगवेगळ्या विषयांवर परिषदाचे आयोजन केले जातात. विभागांतर्गत तीन लाखांपेक्षा पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे तसेच त्यांचे पुनर्वसन केले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे या विभागाच्या निमंत्रक असून विजय कान्हेकर हे संयोजक तसेच अभिजित राऊत समन्वयक म्हणुन जबाबदारी पाहतात. कोअर टीमचे सदस्य आणि राज्यभरातून अनेक सदस्य स्वयंसेवक म्हणुन काम करतात. यात सामाजिक कार्यकर्ते, संस्था, पालक संघटना, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती,पत्रकार यांचा समावेश आहे.

परिषदेच्या व्हाट्सएप ग्रुपला जॉईन करण्यासाठी

परिषदेचा विषय: "केंद्र सरकारची आयुष्यमान भारत जन- आरोग्य योजना व राज्यशासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन- आरोग्य योजना : उपयुक्तता, भुमिका, सल्ला आणि दुरुस्त्या”

राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पूर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ संबंधित रुग्णालयातून उपलब्ध करून देणे हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक जातनिहाय सन-२०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण व शहरी भागातील ८३.७२ लक्ष कुटुंबे योजनेचे लाभार्थी आहेत. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी, आरोग्यमित्र, रुग्ण नोंदणी, उपचारपूर्व मान्यता, योजनेमधील समाविष्ट रुग्णालये, विमा कंपनी, योजनेत समाविष्ट केलेले उपचार, दावे (claims), आरोग्य शिबिरे, पाठपुरावा सेवा, क्लिनिकल प्रोटोकॉल, नियामक समिती, योजनेचा प्रचार, तक्रार निवारण, आर्थिक मर्यादा, निःशुल्क सेवा, ऑनलाईन अर्ज, नवीन शासन निर्णय इत्यादी योजनांचा थेट लाभ घेताना सामान्य जनतेला दिला जातो. यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते, काही अडचणी असल्यास कशा प्रकारे निरसन केले जाते. याबद्ल आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पेपर सादरीकरण करणार आहेत. तसेच याच्या अनुषंगाने सर्वंकष चर्चा करणार आहेत.

सदर परिषदेमध्ये केंद्र सरकारची आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना समजून घेता येईल. तसेच या योजनेचा लाभ कसा घेता येतो, योजनाची सद्यस्थिती, योजना लोकाभिमुख कशा करता येतील याबदल तज्ज्ञाचे मत आणि शासनाची भूमिका जाणुन घेता येईल.

या परिषदेच्या आयोजानासाठी डॉ. समीर दलवाई, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, डॉ. नरेंद्र काळे, निलेश राऊत, अभिजित राऊत, डॉ. कल्याणी मांडके, , डॉ. गणवीर, डॉ. यामिनी अडबे, डॉ अनिल देवसरकर, प्रा. चेतन दिवान विकास लवांडे,रवींद्र झेंडे, गौरव जाधव, पंडित आगा, आदी मान्यवर विशेष सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

परिषदेत सहभागी होणारे प्रतिनिधी
  • महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे जिल्हा व तालुका स्तरावर काम करणारे वैद्यकीय अधिकारी संबंधित तज्ज्ञ व्यक्ती.
  • जिल्हा व तालुका पातळीवरील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आरोग्यसेवक.
  • रुग्णालयांचे आरोग्य मित्र
  • स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी
  • आरोग्य क्षेत्रातील समन्वयक, आरोग्यप्रेमी
टीप

१. सदर परिषदेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी
दिपिका शेरखाने- समन्वयक,
आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभाग,
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई
9867155345
सुकेशनी मर्चंडे
8652118949
022-22045460 - विस्तारित-224
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
12 May 2022
वेळ : 
10:00
ते
05:00
ठिकाण : 
जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई
fmovies
google map embed responsive