औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद केंद्र व शिक्षण विकास मंचच्या वतीने "दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण " या विषयावर मंगळवार,दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी,सायं. ४ ते ६ या वेळेत शिक्षणकट्टा आयोजित करण्यात आला आहे.आईन्स्टाईन हॉल,जे.एन.ई. सी.,महाविद्यालय,एमजीएम परिसर येथे शिक्षणकट्टा संपन्न होणार आहे.
आज मितीला महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या ६१००० प्राथमिक शाळांपैकी जवळपास ३८००० शाळा दोन शिक्षकी आहेत. या दोन शिक्षकी शाळा प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर आणि अगदी छोट्या गावांत आहेत. या शाळांची विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याकारणाने त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नाहीत, म्हणून बंद करण्याची चर्चा अधून मधून होत असते. तथापि या दोन शिक्षकी शाळा अत्यंत प्रभावीपणे काम करताना आणि विद्यार्थी घडवताना दिसत आहेत. त्यामुळे या शाळा बंद न पडता त्यांचे सक्षमीकरण व्हावे, आणि त्या अनुषंगाने पालक आणि शिक्षक यांची मनोभूमिका, शासनाची भूमिका, इत्यादी गोष्टींवर विचारमंथन व्हावे, या उद्दिष्टाने या शिक्षण कट्टयांचे आयोजन आपण करत आहोत.याच विषयावर १६ जानेवारी २०२२ रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे.शिक्षणकट्टयावर झालेली चर्चा परिषदेसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
या कट्ट्यावर शिक्षक,मुख्याध्यापक,शिक्षणतज्ज्ञ,
अभ्यासक,पत्रकार,पालक यांना सहभागी होता येईल.असे आवाहन यासाठी शिक्षण विकास मंचचे संयोजक डॉ.वसंत काळपांडे,विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत,डॉ.माधव सूर्यवंशी,सदस्य डॉ.भालचंद्र कांगो, प्रा.अजीत दळवी, डॉ.श्रीरंग देशपांडे, डॉ.अपर्णा कक्कड,दासू वैद्य,डॉ.मुस्तजीब खान,डॉ.रेखा शेळके,सुहास तेंडुलकर,सुनील किर्दक,रेणुका कड,योगेश कुदळे ,रुपेश मोरे,राजेंद्र वाळके, सुबोध जाधव आदींनी केले आहे.