सोनई ता.नेवासा येथे मुळा एज्युकेशन सोसायटीचे पब्लिक स्कूल प्रांगनात शनिवार दि.10/12/16 रोजी कायदेविषयक शिबिर जिल्हयाचे पालक न्यायमूर्ति श्री एस.एस.शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व् जिल्हा प्रधान न्या.श्री श्रीकांत कुलकर्णी नेवासा येथील जिल्हा न्या.सत्यनारायण नावंदर वकील संघाचे अध्यक्ष अँड.जी.जी.काकड़े ,सचिव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ,मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर श्री प्रशांत पाटिल गडाख ,न्या.शेख़ यांचे उपस्थितीत संपन्न झाले.या प्रसंगी नगर येथील वकील संघाचे अँड.शिवाजी कराळे व् त्यांचे सहकारी वकील कलाकारानी बालकावर होणारे अत्याचार व् लैंगिक अत्याचार दर्शवणारी व् त्यासाठी विधि सेवा प्राधिकरण निभावत असलेली भूमिका दर्शवणारी नाटिका सादर केली व् प्रेक्षकांची मने जिंकली .
या प्रसंगी जिल्हा भरातील विधिज्ञ ,शालेय विद्यार्थी ,नागरीक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन करुन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र अहमदनगर ने जागतिक मानवधिकार दिना निमित्त ग्रामीण भागातील तरुणांना रास्ता वाहन कायदे, संविधानाचे महत्व , तरुणांना आपली जबाबदारी आदींचे सुस्पष्टता स्पष्ट झाली या शिबिरा मुळे महाविद्यालयीन विद्यार्थी यांना खरेखुरे मार्गदर्शन मिळाले. या प्रसंगी विद्यार्थ्याच्या कायदे विषयक प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या.
कायदे विषयक शिबिर संपन्न...
कायदे विषयक शिबिराचे आयोजन ग्रामीण भागात करुण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर चे सचिव मा.प्रशांत पा गड़ाख यांनी नविनच् उपक्रम राबवला.