यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्यास (२३ एप्रिल २०२२) उपस्थित राहण्यासाठी नोंदणी फॉर्म.

पाच क्षेत्रामध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातून १४ युवक-युवतींचा चा होणार सन्मान.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे युवांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. तसेच त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावं म्हणून पुरस्कार दिले जातात. याचाच एक भाग म्हणजे सामाजिक, क्रीडा, उद्योजकता,रंगमंचीय कलाविष्कार व साहित्य या क्षेत्रांतील विविध गुणवंत युवांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी देण्यात आलेल्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१’ ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी होणार असून आपण या सोहळ्यास उपस्थित राहावे ही आग्रही विनंती.

ठिकाण
४ था मजला, रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग,मंत्रालयासमोर, मुंबई ४०००२१.

शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२

दुपारी ०२:३० ते ०४:३०

या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या गुगल लिंक वर क्लिक करून फार्म भरावा.

टीप -
- सदर सोहळ्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क-
संतोष मेकाले - +919860740569
(नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई )

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
23 April 2022
वेळ : 
02:30
ते
04:30
ठिकाण : 
४ था मजला, रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग,मंत्रालयासमोर, मुंबई ४०००२१.