दीक्षा दिंडे
युवा सामाजिक पुरस्कार
2025
जिद्द, चिकाटी आणि बदल घडवण्याची आस ही ओळख आहे दीक्षा दिंडे यांची ! ज्यांनी स्वतःच्या मर्यादांनाच आपली शक्ती बनवलं. ‘इक्विब्रिज फाउंडेशन’च्या संस्थापक असणाऱ्या दीक्षा दिंडे गेल्या १० वर्षांहून अधिक काळ दिव्यांग व्यक्तींचे अधिकार आणि समावेशकता या क्षेत्रात कार्यरत आहेत.
केवळ पदव्या मिळवणं हे त्यांचं ध्येय नव्हतं, तर समाजात ‘समान संधी’ निर्माण व्हावी यासाठी त्यांनी कंबर कसली. ॲक्सेसिबिलिटी ऑडिटर म्हणून त्या आजही ग्राउंड लेव्हलवर काम करत आहेत. त्यांची 'इन्क्लूजन यात्रा' ही एक क्रांतीच ठरली. १३० दिवस संपूर्ण महाराष्ट्र फिरून त्यांनी ४० हजारांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती केली. त्यांच्या या कामाची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. भारत सरकारचा नॅशनल युथ अवॉर्ड असो वा लंडनमधील ग्लोबल युथ ॲम्बेसेडर म्हणून काम, दीक्षा यांनी महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं. आज 'इक्विब्रिज फाउंडेशन'च्या माध्यमातून त्या एक असा समाज घडवत आहेत, जिथे कोणीही मागे राहणार नाही. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे.
दीक्षा दिंडे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.



