साक्षी धनसांडे

युवा इनोव्हेटर पुरस्कार
2023

मुळच्या अमरावतीच्या असणाऱ्या साक्षी यांचे शिक्षण पॉलिटेक्निक संदर्भात असले तरी इतिहासाविषयीची त्यांची आवड वाखाणण्याजोगी आहे. किल्ले बनविणे, पारंपारिक शस्त्र चालवणे ही त्यांची आवड. विविध स्पर्धांमध्ये त्यांची सातत्याने निवड देखील होत आहे. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, आणि संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सामाजिक क्षेत्राविषयीची त्यांची आवड बघता भविष्यकाळात सामुहिक प्रयत्नांच्या जोरावर त्या नक्कीच बदल घडवून आणतील, हा विश्वास आहे.

साक्षी धनसांडे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery