अमोल देशमुख

युवा साहित्य पुरस्कार
2023

अमोल देशमुख यांचा जन्म परभणीचा. इंग्रजी आणि मराठी दोन्ही विषयांत त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. लहानपणापासून वाचनाची आवड असल्यामुळे, शब्द संचिता मुळे ते पुढे जाऊन कविता लिहिण्याकडे वळले. युगांतर ,वाघूर,पद्मरत्न, भूमिका, सह्याचल इत्यादी दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. तसेच रती, मुराळी, प्रतिष्ठान, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, विचारभारती इत्यादी नियतकालिकांत देखील त्यांच्या कविता प्रकशित झाल्या आहेत.

अमोल देशमुख यांचा ‘आठ फोडा आन बाहेर फेका’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. मराठवाडा बोलीतील येत असलेल्या शब्दकोश निर्मितीत त्यांचा सहभाग आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढवुळगाव ता.वसमत जि.हिंगोली येथे अमोल शिक्षक पदावर कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ काव्य पुरस्कार, लातूर येथील ल.र.फाउंडेशनचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ काव्य पुरस्कार, शेगाव ता.चंद्रपूर येथील बापूराव पेटकर उत्कृष्ठ काव्य सन्मान पुरस्कार मिळाले आहेत.

अमोल देशमुख यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा साहित्य पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery