पवन नालट

युवा साहित्य पुरस्कार
2022

"माझ्या एका हातात संस्कारांची शिदोरी असते आणि एका हातात धारदार शस्त्र हे शस्त्र मी रोज उपसत असतो श्वासांवरती येणारी जळमटे दूर करण्यासाठी"

आपल्या शब्दातून आयुष्या बद्दलचा हा असा संदर्भ पोखरायचे धाडस पवन नालट हेच करू शकतात. पवन नालट लिखित "मी संदर्भ पोखरतोय" या काव्यसंग्रहाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. पवन यांच्या या काव्यसंग्रहाचे बीज आहे, आजच्या आधुनिक युगातही स्त्रियांचे अव्याहत सुरु असलेले शारीरिक, मानसिक शोषण, शिक्षण क्षेत्राची झालेली अधोगती, अज्ञानाच्या अंधारात दिशाहिन होत असलेले वर्तमान पिढीचे भविष्य, समाजातील बिघडलेली सामाजिक स्थिती, राजकीय पर्यावरण, व्यवस्थेतील फोफावलेला भ्रष्टाचार आणि यामुळे हवालदिल झालेला सामान्य माणूस..!

कविता म्हणजे काय? असा प्रश्न जेव्हा पवन यांना विचारण्यात येतो तेव्हा त्यांचे उत्तर असते, “कविता म्हणजे आपल्या आतलं काहीतरी भाषेला देण आणि ही प्रक्रिया साधी कधीच नसते.” लहानपणापासूनच कष्ट, संघर्ष जवळून पाहिल्यामुळे ज्या गोष्टी पवन यांच्या मनात धुमसत होत्या त्या शब्दांच्या, कवितेच्या रूपाने बाहेर येत गेल्या.

पवन नालट यांच्या साहित्यिक प्रवासासाठी सदिच्छा…!

पवन नालट यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य युवा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery