सारंग नेरकर
इनोव्हेटर पुरस्कार
2022
जिज्ञासा, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सारंग नेरकर यांनी इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठात प्रवेश मिळवला. त्या ठिकाणी सारंग यांनी “वेअरेबल कॉम्प्युटिंगचे जनक” प्रोफेसर स्टीव्ह मान यांच्यासोबत संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम केले. या अनुभवामुळे तंत्रज्ञान आणि मानवतावादी बुद्धिमतेच्या छेदनबिंदूचा शोध घेण्यात त्यांची आवड निर्माण झाली. वेअरेबल कॉम्प्युटिंग, ऑगमेंटेड रिअॅलिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कॉम्प्युटेशनल फोटोग्राफी यासारख्या विषयांचा त्यांनी अभ्यास केला. सारंग यांच्या संशोधनामुळे मॉड्युलर ऑगमेंटेड रिअॅलिटी चष्मा, स्मार्ट टाइम-लॅप्स कॅमेरे आणि वेअरेबल कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्मेसह अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांचा उदय झाला. गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड, झी युवा सन्मान आणि वर्ल्ड बँक एजी ऑब्झर्व्हेटरी कडून टॉप इनोव्हेटर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांच्या कार्यासाठी मिळाले आहेत.
जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, ही सारंग यांची आवड ! याच आवडीमुळे त्यांना Innosapien Technologies या स्टार्टअपचा जन्म झाला. या माध्यमातून सारंग यांनी सार्वजनिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांवर भर देऊन त्यांचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला.
भारतातील प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये भरविण्यात आलेल्या कृषी स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये भारताच्या पंतप्रधानांसमोर Innosapien Technologies सादर करण्याची संधी सारंग यांना मिळाली. सारंग नेरकर सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस या विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
समाजोपयोगी नवकल्पना निर्माण करण्याचा त्यांचा उत्साह असाच वृद्धिंगत होत राहो, या सदिच्छा…!
यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.