मुग्धा डिसोझा
रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2022
गेल्या २० वर्षापासून नृत्य कला जोपासत असणाऱ्या मुग्धा डिसोझा यांनी गुरू शर्वरी जमिनीस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कथक या नृत्य प्रकारात एम.ए ची पदवी प्राप्त केली. आजच्या घडीला ओरिसा येथील श्री.श्री. युनिव्हर्सिटी अंतर्गत पी.एच.डी करत आहेत.
गुरू शर्वरी जमिनीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रतिष्ठित नृत्य महोत्सवात मुग्धा यांनी सहभाग नोंदवला आहे. जसे की, खजुराहो फेस्टिवल, पुणे फेस्टिवल, गोवा कला अकादमी फेस्टिवल, नांदेड महोत्सव…!
आजपर्यंत मुग्धा यांना 'नृत्य प्रतिभा श्रेष्ठ पुरस्कार, "युवा कला गौरव पुरस्कार, गुणिजन गौरव पुरस्कार तसेच २०१५ सालच्या उत्कर्ष फेस्टीवलमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर दुबई आणि कोरिया सरकारकडून नृत्य सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
या नृत्या बरोबरच त्या एक डान्सर व्हिडिओग्राफर आहेत. आजपर्यंत ३०० पेक्षा जास्त नृत्य सादरीकरणे त्यांनी आपल्या कॅमेरात टिपले आहेत. "नृत्यावली" नावाची त्यांची एक नृत्य संस्था आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५० हून अधिक नृत्यांगना त्या संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.