मुस्तान मिर्झा
पत्रकारिता युवा पुरस्कार
2022
जिथे कसलाही शिक्षणाचा संबंध नव्हता अशा कुटुंबात मुस्तान मिर्झा यांचा जन्म झाला. शाळेत पाठवतात म्हणून शाळेत जायचे या धारणेने त्यांनी शाळा पूर्ण केली. दहावीपर्यंत त्यांच्या शिक्षणाला कसलीही दिशा नव्हती. महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यावर त्यांना आत्मविश्वास आला की आपण खूप काही करू शकतो. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
पत्रकारिता करायची या उद्देशाने त्यांनी पुणे विद्यापीठात प्रवेश मिळवला. पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूज18 लोकमत, साम टीव्ही, झी 24 तास तसेच एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी काम केले. सध्या मुंबई तक या डिजिटल चॅनेलमध्ये असिस्टंट प्रोड्युसर म्हणून ते काम पाहत आहेत.
त्यांच्या सात वर्षाच्या पत्रकारितेत त्यांनी चांद ते बांदा पर्यंतच्या बातम्या हाताळल्या आहेत. गारपिटी, अतिवृष्टी यामुळे होणारे पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अस एविशय प्रामुख्याने त्यांनी हाताळले आहेत.
वयाच्या २७ व्या वर्षी हृदयाचा विकार झाला आणि अँजिओप्लास्टी करावी लागली. तरीदेखील न डगमगता त्यांनी पुन्हा पत्रकारीतेच्या रिंगणात पाऊल ठेवले आणि विविध विषय ते हाताळत आहेत.
त्यांचे पत्रकरिता क्षेत्रातील हे काम असेच वृद्धिंगत होत राहो, या सदिच्छा…!
मुस्तान मिर्झा यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.