हर्षदा गरुड

क्रीडा युवा पुरस्कार
2022

मुळच्या पुण्याच्या असणाऱ्या हर्षदा गरुड यांनी २०१७ पासून वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण चालू केले. घरची परिस्थिती प्रतिकूल असताना देखील हर्षदा यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्या आई वडिलांनी तिला प्रशिक्षणास पाठवले. गुरुकुल मधील दुबे सरांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सन २०१९ पासून प्रत्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हर्षदा यांनी भाग घेण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक स्पर्धेत पदक देखील प्राप्त केले आहे.

२०२० आणि २०२२ साली भरविण्यात आलेल्या खेलो इंडियामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदके, २०२२ रोजी मनामा, बहरैन येथे आयोजित "आशियाई वरिष्ठ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप" मध्ये कांस्य पदक मिळाले आहे.

ग्रीस २०२२ च्या हेरक्लिओन येथे झालेल्या IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय भारोत्तोलक म्हणून हर्षदा यांची ओळख आहे.

वेटलिफ्टिंगच्या माध्यमातून पदकांचा आलेख असाच उंचावत जावा, यासाठी सदिच्छा…!

हर्षदा गरुड यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय क्रीडा युवा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery