यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ / संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान" देण्यात येतो. दिनांक ३० जून २०२४ ते १० सप्टेंबर २०२४ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यात यावा.
आपल्या कार्यकर्तृत्वातून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्था स्थापन करतात. आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करतात. या संघाचा किंवा संस्थेचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे.
या सन्मानाचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र आणि सन्मानाची रक्कम असे राहील. हा सन्मान सोहळा दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न होईल.
अर्ज डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटला भेट द्यावी. www.chavancentre.org
नियमावली -
- अर्ज स्वीकारण्याची मुदत ३० जून २०२४ ते १० सप्टेंबर २०२४ पर्यंत राहील. १० सप्टेंबर २०२४ नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
- संघ / संस्था मागील पाच वर्षे सातत्याने उपक्रम राबवित असायला हवी.
- संघ/संस्था (Societies Registration Act, 1860 or Bombay Public Trusts Act, 1950) रजिस्टर असायला हवी.
- संघ / संस्था हा भारतीय संविधानाला अनुसरून कार्यरत असणारा पाहिजे.
- अर्जदार ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्था हे महाराष्ट्र राज्यातील असावेत. संपूर्ण राज्यभरातून अर्ज स्वीकारले जातील.
- समाजसेवा, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, कृषी, सहकार, आरोग्य, विधी व न्याय, साहित्य, पर्यावरण या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संघ / संस्था अर्ज करू शकतात.
- सन्मानाचे स्वरूप - सन्मानचिन्ह, मानपत्र, सन्मानाची रक्कम.
- निवड समितीचे निर्णय अंतिम राहतील.
अधिक माहितीसाठी संपर्क मनीषा खिल्लारे - ९०२२७१६९१३