यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे सोमवार दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी सायं ४ वाजता काव्यमैफिल आयोजित करण्यात आली आहे.
एकूण दोन काव्यरंग पार पडतील. त्यातील पहिल्या काव्यरंगात अनघा गोखले, स्मिता औताडे, नेहा ओक, शिल्पा राणे, माधुरी कुलकर्णी, लता सगणे, कविता मडके, उषा चांदुरकर, पद्मिनी शंकरशेठ, उज्वला लिखते यांचा सहभाग असणार आहे. सूत्रसंचालन जयश्री संगितराव करतील तर अध्यक्ष म्हणून अनुराधा नेरुरकर या उपस्थित राहतील. दुसऱ्या काव्यरंगात फरझाना इक़बाल, सुवर्णा जाधव, हेमांगी नेरकर, वृषाली शिंदे, लता गुठे, विद्या प्रभु यांचा सहभाग असणार आहे. सूत्रसंचालन ज्योती कपिले करतील तर अध्यक्ष म्हणून गौरी कुलकर्णी या उपस्थित राहतील.
या कार्यक्रमात विविध संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान देखील होणार आहे. त्यात लता गुठे, विजयालक्ष्मी अणे, स्वाती घोगरे यांचा समावेश आहे.
रिमझिम बरसणाऱ्या पावसासोबत संवेदनांची शब्दचित्रे निर्माण करणारी ही काव्यमैफील अनुभवण्यास नक्की या. तरी आपणांस विनंती आहे की या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे.
वेळ – सोमवार, दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी सायं ४ वा.
स्थळ – सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-२१