यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटर, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे- मानसशास्त्र विभाग, कर्वे समाजसेवा संस्था पुणे आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “राज्यस्तरीय मानसिक आरोग्य परिषद २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांसाठी ‘मानसिक आरोग्य आणि सर्वांचे कल्याण’ हे घोषवाक्य २०२२ सालाकरीता निश्चित केले आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे मनुष्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त आहे. त्यामुळे अकालिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी मानवाचे मानसिक आरोग्य सुदृढ़ असणे गरजेचे आहे. याच उद्देशाला धरून ही राज्यस्तरीय मानसिक आरोग्य परिषद आयोजित केली गेली आहे.
या परिषदेत डॉक्टर, तज्ज्ञ व्यक्ती मानसिक आरोग्य संबंधित विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शक आणि त्यांचे विषय पुढीलप्रमाणे -
१. विषय:- मन म्हणजे काय ? मनाचे आरोग्य का महत्वाचे आहे.
मार्गदर्शक- डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ
२. विषय:- मानसिक स्वास्थ्य : सद्यस्थिती आणि आव्हाने.
मार्गदर्शक- डॉ. हमीद दाभोळकर, मानसोपचारतज्ज्ञ
३. विषय:- मानसिक आरोग्य कायद्याची सकारात्मक अंमलबजावणी आणि संसाधनांची उपलब्धता
मार्गदर्शक - डॉ. विद्याधर वाटवे, व्यसनमुक्ती मानसोपचारतज्ज्ञ
४. विषय:- मनोरुग्ण व विशेष मुलांच्या काळजी आणि व्यवस्थापनामधील पालक व संस्थांची भूमिका
मार्गदर्शक - डॉ चंद्रशेखर देसाई, अध्यक्ष, नवक्षितिज पुनर्वसन केंद्र, पुणे
या परिषदेस सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे. या परिषदेस उपस्थित राहण्याकरीता पूर्वनोंदणी आवश्यक असून खाली दिलेल्या गुगल फॉर्म वर नोंदणी करा.
इथे रजिस्टर करा
या परिषदेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपमध्ये देखील सहभागी होऊ शकता.
व्हाट्सअप ग्रुप
रविवार, दि.२० नोव्हेंबर २०२२ | दु. २:३० ते सायं. ६:००
स्थळ- महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरूड, कमिन्स कंपनीच्या मागे, पुणे-४११०३८
अधिक माहितीसाठी-
विजय कान्हेकर - ९९२१७४०९९९
दिपिका शेरखाने - ९८६७१५५३४५
सुकेशनी मर्चंडे - ८६५२११८९४९
वंदना वाळींजकर - ८१६९४९३१६१