यशवंतराव चव्हाण सेंटर आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफलाईन शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला आहे. ‘नवीन शैक्षणिक धोरण-2020 महाराष्ट्रातील अंमलबजावणी’ या विषयावर हा शिक्षण कट्टा होणार आहे. शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता न्यू इंग्लिश स्कूल,रमणबाग, शनिवार पेठ,पुणे येथे हा कट्टा आयोजित करण्यात आला आहे.
या शिक्षण कट्टयाला मा. विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य,पुणे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.
हा कार्यक्रम विनाशुल्क असेल. नावनोंदणी आवश्यक आहे. या कार्यक्रमात शिक्षक,पालक,अभ्यासक, पत्रकार,महाविद्यालयीन विद्यार्थी यांना सहभागी होता येईल. नावनोंदणी सोबत दिलेल्या गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी.
अधिक माहितीसाठी- महेंद्र गणपुले - 9423050550 सागर नंदकुमार - 9545597197 अप्पा सावंत - 9226268037 योगेश कुदळे - 9370799791
डाॅ. वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर