यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान" देण्यात येतो. दिनांक ३० जून २०२४ ते १० सप्टेंबर २०२४ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यात यावा.
आपल्या कार्यकर्तृत्वातून सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या सन्मानाचा उद्देश आहे. हा सन्मान वैयक्तिकरित्या देण्यात येणार आहे.
या सन्मानासाठी दोन महिला, दोन पुरुष, एक ट्रान्सजेंडर किंवा दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल. सन्मानाचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र आणि सन्मानाची रक्कम असे राहील. हा सन्मान सोहळा दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न होईल.
नियमावली -
- अर्ज स्वीकारण्याची मुदत ३० जून २०२४ ते १० सप्टेंबर २०२४ पर्यंत राहील. १० सप्टेंबर २०२४ नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
- अर्जदाराचे वय ६५ वर्ष व त्यापुढे असावे.
- वय वर्ष ६० नंतर केलेल्या कार्यास प्राधान्य दिले जाईल.
- यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक सन्मानासाठी संपूर्ण राज्यभरातून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- समाजसेवा, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, कृषी, सहकार, आरोग्य, विधी व न्याय, साहित्य, पर्यावरण, या क्षेत्रासाठी अर्ज करता येईल. ६. निवड समितीच्या वतीने सन्मानासाठी दोन महिला, दोन पुरुष व एक ट्रान्सजेंडर किंवा दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल.
- सन्मानाचे स्वरूप - सन्मानचिन्ह, मानपत्र, सन्मानाची रक्कम.
- निवड समितीचे निर्णय अंतिम राहतील.
अधिक माहितीसाठी संपर्क
मनीषा खिल्लारे - ९०२२७१६९१३