यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान प्रश्नमंजुषा-२०२३चे आयोजन करण्यात आले. या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण ६०७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. मराठी, इंग्रजी या दोन भाषेत झालेल्या स्पर्धेस राज्यातील विविध भागातून भरघोस प्रतिसाद मिळाला. शालेय गटात नाशिकचा सार्थक कोकाटे, महाविद्यालयीन गटात सांगलीची सुफिया नायकवाडी आणि खुल्या गटात अहमदनगरच्या माया चव्हाण प्रथम आल्या आहेत.

संविधान प्रश्नमंजुषा २०२३ निकाल

शालेय गट निकाल
  1. प्रथम क्रमांक -
    Kokate Sarthak Bhausaheb - Nashik
  2. द्वितीय क्रमांक -
    Aaradhya Dattatraya gore - Nanded
  3. तृतीय क्रमांक -
    Srushti Sopan Katore - Ahmednagar
महाविद्यालयीन गट निकाल
  1. प्रथम क्रमांक -
    Sufiya Ismail Naikawadi - Sangli
  2. द्वितीय क्रमांक -
    Vaishnavi Gajanan Eknar - Washim
  3. तृतीय क्रमांक -
    Janhavi Gajanan Eknar - Washim
खुला गट निकाल
  1. प्रथम क्रमांक -
    Mrs. Maya Anil Chavan - Ahmednagar
  2. द्वितीय क्रमांक -
    Sanatkumar Kisanrao Tayde - Mumbai Suburb
  3. तृतीय क्रमांक -
    Rahul Shripal Pandit - Solapur

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डाॅ.वसंत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आली.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!

या स्पर्धेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डाॅ.शिवानी लिमये, भाऊसाहेब उमाटे, राहुल प्रभु यांचे सहकार्य लाभले. या सर्व प्रक्रियेची तांत्रिक बाजू अजित तिजोरे यांनी सांभाळली. समन्वयाचे काम डाॅ.माधव सूर्यवंशी यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाचे प्रमुख योगेश कुदळे, शिक्षण कट्टयाच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.