यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार" सुरू करण्यात आले आहेत. दिनांक २१ ऑगस्ट २०२३ ते २० सप्टेंबर २०२३ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज करण्यात यावा.
आपल्या कार्यकर्तृत्वातून सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे. हा पुरस्कार वैयक्तिकरित्या देण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी दोन महिला, दोन पुरुष, एक ट्रान्सजेंडर किंवा दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र आणि पुरस्काराची रक्कम असे राहील. हा पुरस्कार वितरण सोहळा
दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न होईल.
दरवर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध विभागासाठी जाहीर करण्यात येणार आहे. तरी यावर्षीच्या पुरस्कारासाठी कोकण विभागाची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, आणि मुंबई उपनगर, या जिल्ह्यातील अर्ज स्वीकारले जातील कृपया याची नोंद घ्यावी.
अर्ज डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटला भेट द्यावी. www.chavancentre.org
अधिक माहितीसाठी संपर्क
मनीषा खिल्लारे - ९०२२७१६९१३