यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप' प्रदान सोहळा आदरणीय शरद पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी.डी मायी उपस्थित होते.
आदरणीय साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने गेल्या वर्षी या फेलोशीप'ची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली.
याअंतर्गत कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर) , साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते.
कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, राजेंद्र पवार, प्रा निलेश नलावडे व सह्याद्री फार्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत आहे. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत.
या फेलोशिपला दुसऱ्या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळाला. चव्हाण सेंटरच्या निवड समितीने २०२२-२०२३ या दुसऱ्या बॅचसाठी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार साहित्य फेलोशिप' साठी १२ व ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’ साठी ४० अशा एकूण १३२ फेलोंची निवड केली आहे. या सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते फेलोशिप सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, चव्हाण सेंटरच्या सीईओ दीप्ती नाखले, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ प्रोफेसर निलेश नलावडे, प्रा. नितीन रिंढे, दत्ता बाळसराफ, योगेश कुदळे, तीनही फेलोशिपच्या सल्लागार समितीचे सदस्य, निवड समितीचे सदस्य, पहिल्या व दुसऱ्या वर्षीचे फेलोज् व त्यांचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.
फेलोशिपसाठी निवड झालेल्या सर्व फेलोंचे मन:पूर्वक अभिनंदन.